ताजी बातमी

मी झालेल्या प्रकाराचा निषेध करते तसेच निवडणूक आयोग व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करते कि सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मला संरक्षण द्यावे आणि गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश त्वरित द्यावे - उर्मिला मातोंडकर 

आज सोमवार, दिनांक १५ एप्रिल २०१९ रोजी सुमारे ११ च्या सुमारास निवडणूक विभागाच्या पूर्व परवानगीने बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना अभिवादन करत असताना भाजपच्या २० ते २५ गुंडांनी "मोदी - मोदी" अशा घोषणा देऊन नंतर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना अश्लील हावभाव, शिव्या आणि धक्काबुकी करून माझा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. माझे मानसिक खच्चीकरण आणि माझी कुचंबणा करण्याचा प्रयत्न केला. आदर्श आचारसंहितेचा भंग केला. या सर्व घटनांचा मी तीव्र शब्दात निषेध करते. निवडणूक व्यवस्थित पार पाडणे व विरोधकांना आपले मत चांगले मांडता यावे यासाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाही आहेत. विरोधकांची वारंवार गळचेपी केली जात आहे. लोकशाही दडपण्याचा सरकारचा प्रयत्न अतिशय निंदनीय आहे. निवडणूक आयोगाकडून रीतसर परवानगी असताना विरोधी पक्ष म्हणजेच भाजप व त्यांचे कार्यकर्ते त्याच वेळी कसे काय येऊ शकतात. माझा प्रचार थांबवणे, मला घाबरवणे, परिसरात दहशत माजवणे, कायद्याचा अपमान करणे ए सर्व गुन्हे आज सदर ठिकाणी घडलेले आहेत, अशी माहिती काँग्रेसच्या उत्तर मुंबई उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी दिली. 

त्या पुढे म्हणाल्या कि गेल्या आठवड्यात गोपाळ शेट्टी यांनी माझ्या चेहऱ्याकडे बघून मला उमेदवारी दिली असे वादग्रस्त विधान केले होते. हे अत्यंत आक्षेपार्ह्य आणि खालच्या पातळीचे राजकारण असून प्रत्येक स्त्रीकरिता अपमानास्पद आहे. भाजपचे मंत्री, आमदार, खासदार, प्रवक्ते वारंवार महिलांचे जाहीर अपमान करत आहेत परंतु पक्ष नेतृत्वाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई आत्तापर्यंत झालेली नाही, उलट त्यांना अभय आणि प्रोत्साहन दिले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. भाजपचे प्रवक्ते म्हणतात कि "तुम्हे डर लगता है तो पेटीकोट और चुडिया पहणो" असे ते लाईव्ह डिबेट मध्ये महिला अँकर समोर बोलतात. एक आमदार म्हणतात मुली पटत नसतील तर पळवून आणा मी तुमच्या पाठीशी आहे. एक मंत्री म्हणतात

मला म्हातारे समजू नका, या पिकल्या पानाचा देढ अजून हरवा आहे. एक मंत्री म्हणतो दारूच्या ब्रॅण्डला महिलांची नवे द्या मग बघा कसा खप वाढतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी "बेटी बचाओ बेटी पढाओ" असा फक्त नारा देतात. प्रत्यक्षात मात्र त्यांच्याच पक्षातील नेते दररोज महिलांचा जाहीरपणे अपमान करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रात असे उद्गार शोभत नाहीत. महाराष्ट्रात स्त्रियांना मान सन्मान देण्याची परंपरा आहे. महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे हात पाय तोडण्याचे आदेश शिवाजी महाराज द्यायचे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मान सन्मान देऊन शिवाजी महाराजांनी परत पाठविले होते. महाराजांचा महाराष्ट्र स्त्रीला सर्वोच्च दर्जा देतो. 

उर्मिला मातोंडकर पुढे म्हणाल्या कि उत्तर मुंबईतील तसेच सर्व देशातील जनता हा प्रकार पाहत आहे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचे हे निदर्शक आहे. संपूर्ण काँग्रेसच्या वतीने मी झालेल्या प्रकाराचा निषेध करते तसेच निवडणूक आयोग व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करते कि सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मला संरक्षण द्यावे आणि गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश त्वरित द्यावे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात