ताजी बातमी

मुंबई दि.10 - तामिळनाडू मध्ये लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेच्या 18 जागांवर पोटनिवडणूक एकत्र होत आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) चे 3 उमेदवार लोकसभा आणि 2 उमेदवार विधानसभेची पोटनिवडणूक लढत असून त्यांच्या प्रचारासाठी रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले उद्या गुरुवार दि. 11 एप्रिल रोजी चेन्नई दौरा करणार आहेत. त्यासाठी ते आज रात्री उशिरा ते पुण्यातून चेन्नईला रवाना होणार आहेत.


तामिळनाडू मध्ये लोकसभेच्या 39 जागा असून त्यापैकी दोन जागा रिपाइं ला सोडण्याची भाजपकडे मागणी केली होती मात्र रिपाइंला  जागा सोडल्या नसल्यामुळे रिपाइं तर्फे स्वबळावर 3 जागा लढविण्यात येत असून अन्य 36 जागांवर भाजप - एआयडीएमके युतीला  रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा देण्यात आला आहे. तसेच तामिळनाडू  विधानसभेच्या 18  जागांवर पोटनिवडणूक होत असून त्यातील 2 जागांवर रिपाइं स्वबळावर निवडणूक लढत आहे.  अन्य जागांवर भाजपला रिपाइंचा पाठिंबा देण्यात आला आहे.दक्षिण चेन्नई लोकसभा मतदारसंघात रिपाइं चे पॉवर स्टार श्रीवासन; मध्य चेन्नई लोकसभा मतदारसंघात रिपाइं चे जितेंद्र कुमार जैन; थिरुवैवुर लोकसभा मतदारसंघात रवी परणारा हे तीन रिपाइं चे  लोकसभेचे उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांच्या प्रचारासाठी ना रामदास आठवले उद्या चेन्नई दौरा करणार आहेत. तसेच पेरंबुर विधानसभा मतदारसंघात रिपाइं चे हर्षित जैन   आणि साथुर विधानसभा मतदारसंघात रिपाइं चे दलित धर्मा हे पोटनिवडणूक लढत आहेत. या पाचही उमेदवारांचा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले प्रचार सभा ;रोड शो घेऊन प्रचार करणार आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात