ताजी बातमी

सलग चार वेळा नगरसेवक पदाचा  ज्यानी‌ सन्मान केला.सात वर्ष स्थायी समिती सदस्य आणि स्थायी समिती अध्यक्ष पदाला योग्य समन्वय साधून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे भांडुप पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ११४ चे लोकप्रिय रमेश कोरगावकर यांना विभाग प्रमुख पदावर नियुक्ती जाहिर  करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र.७ च्या शिवसेना विभागप्रमुख पदी नगरसेवक रमेश कोरगावकर यांची नियुक्ती करण्यात आली.
भांडुप, व मुलुंड विक्रोळी या तीन विधान सभा क्षेत्राची महत्व पूर्ण जबाबदारी म्हणून कोरगावकर  यांना देण्यात आली आहे.
माजी महापौर दत्ता दळवी यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.अखेर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रमेश कोरगावकर यांना नियुक्ती करुन संघटना वाढीसाठी आवश्यक तेथे निर्णय घेण्यासाठी पुढील काळासाठी जबाबदारी दिल्याचे समजते.
मुलुंड येथील काही पदाधिकारी बदलले जातील असे सूत्रांनी सांगितले. अखिल भांडुप शिवसेना विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या वतीने रमेश कोरगावकर यांचे अभिनंदन केले आहे. पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी जी माझ्यावर विश्वासाने जबाबदारी दिली आहे ती मी सार्थ करेन.व संघटनेचे कामाला न्याय्य देईन, अशी पहिली प्रतिक्रिया विभाग प्रमुख रमेश कोरगावकर यांनी व्यक्त केली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात