ताजी बातमी

मुंबई : मुंबईतील फोर्ट परिसरातील पटेल चेंबर्सला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 18 गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम सुरु आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, फोर्ट भागात असलेल्या पटेल चेंबर्सला पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीमुळे चेंबर्सचा काहीसा भाग कोसळला. यात अग्निशमन दलाचे दोन अधिकारी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  दरम्यान, अद्याप या आगीचे कारण अस्पष्ट आहे.  

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात