ताजी बातमी

दर महिन्याच्या दुस-या मंगळवारी पेन्शन अदालत  घेण्याचे निर्देश 


तथापि, या महिन्यात दुस-या मंगळवारी सुट्टी असल्याने ‘पेन्शन अदालत’ सोमवारी

पालिका निवृत्ती वेतनधारकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, यादृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सोमवार, दिनांक ०८ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत ‘उच्चस्तरीय पेन्शन अदालत’ चे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख लेखापाल (कोषागार), प्रमुख लेखापाल (कोषागार) यांचे कार्यालय, बृहन्मुंबई महानगरपालिका, ई-विभाग कार्यालय इमारत, तिसरा मजला, शेख हफीजुद्दीन मार्ग, भायखळा (पश्चिम), मुंबई – ४००००८ याठिकाणी ही पेन्शन अदालत भरणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख लेखापाल (कोषागार) यांनी दिली आहे. 


महानगरपालिकेतील निवृत्ती वेतनधारक त्यांच्या विविध समस्यांकरिता सतत महानगरपालिका आयुक्त कार्यालयाशी पत्रव्यवहार करतात, त्यांच्या प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रमुख लेखापाल (कोषागार) यांच्याकडे दर महिन्याच्या दुस-या मंगळवारी ‘उच्चस्तरीय पेन्शन अदालत’ सुरु करण्यात आली आहे. निवृत्ती वेतनधारकांचे प्रश्न मार्गी लावावेत, हा या ‘पेन्शन अदालती’चा प्रमुख उद्देश आहे. या ‘पेन्शन अदालत’मध्ये प्रमुख लेखापाल (कोषागार) यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख कर्मचारी अधिकारी व उप कायदा अधिकारी यांची त्रिसदस्यीय समिती पेन्शनधारकांची सर्व गा-हाणी ऐकून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. तथापि, या ऑगस्ट महिन्यातील दुस-या मंगळवारी म्हणजेच  दिनांक ०९ ऑगस्ट, २०२२ रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने सदर अदालत सोमवार, दिनांक ०८ ऑगस्ट, २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

..

या अदालतीमध्ये ज्या प्रकरणांचा सहाय्यक महानगरपालिका आयुक्त / खाते प्रमुख / अधिष्ठाता यांच्या स्तरावर निवृत्ती वेतनधारकांच्या समस्यांचे निराकरण झालेले नाही, अशाच प्रकरणांचा समावेश करण्यात येणार आहे. सहाय्यक महानगरपालिका आयुक्त / खाते प्रमुख / अधिष्ठाता कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर केलेले निवृत्ती वेतनधारक या पेन्शन अदालतीमध्ये थेट उपस्थित राहू शकणार आहेत.  

..

तरी या तपशिलानुसार ‘पेन्शन अदालत’ मध्‍ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवृत्त वेतनधारकांच्या निवृत्ती वेतना संबंधीच्या समस्‍या सुटलेल्‍या नाहीत, त्‍यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात