ताजी बातमी

राजभवन येथे कार्यरत असलेले राजभवन सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक विकास धोंडीराम भुजबळ यांच्या आकस्मिक निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 


श्री भुजबळ कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व मनमिळावू अधिकारी होते. हसतमुख असलेले भुजबळ यांचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी स्नेहपूर्ण संबंध होते. त्यांच्या निधनामुळे आपण एका संवेदनशील पोलीस अधिकाऱ्याला मुकलो आहो, या शब्दात राज्यपालांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. 


भुजबळ, ५५ यांना आज दुपारी राजभवन परिसरातील त्यांच्या कार्यालयात असतानाच छातीत दुखू लागल्याने इतर अधिकाऱ्यांनी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु प्रवेश होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. श्री भुजबळ यांनी मुंबई आणि राज्यात इतर अनेक ठिकाणी कर्तव्य बजावले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. 


 (राज्यपाल कोश्यारी यांच्या वाढदिवसाचे दिवशी विकास भुजबळ यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळचे हे छायाचित्र आहे)

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात