वाळू व गाळ काढण्यासाठी एक शास्त्रशुद्ध कार्यक्रम जलसंपदा विभागाने आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
पावसामुळे वारंवार येणाऱ्या पुराचा धोका लक्षात घेता पूर संरक्षणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी एक शास्त्रशुद्ध कार्यक्रम जलसंपदा विभागाने आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यांनी गडचिरोली,वर्धा,यवतमाळ, चंद्रपूरमधील नुकसानीचा आढावा घेतला.
पुरामुळे मृत्यू ओढवलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना मदत वितरित झाली आहे. मात्र, जखमींवर सुरू असलेले उपचार योग्य व वेळेत होण्याबाबत खबरदारी घ्या.पूर ओसरल्यानंतर जलजन्य आजारांचा फैलाव होऊ नये म्हणून स्थानिक आरोग्य यंत्रणांनी खबरदारी घ्यावी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
पूरग्रस्त भागातील शेती तसेच इतर नुकसानीचे #पंचनामे तात्काळ करून त्याचे प्रस्ताव शासनाला सादर करा. कोणताही आपत्तीग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये याची खबरदारी प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यात पावसामुळे झालेल्या १०९ मृत्यूंपैकी ६० टक्के #मृत्यू हे अंगावर वीज पडल्याने झाले आहेत. त्यामुळे असे मृत्यू होऊ नयेत यासाठी वीज अटकाव यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यासाठी तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार मदत व पुनर्वसन विभागाने काम करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना