ताजी बातमी

राज्य शासनामार्फत ९ ते १७ ऑगस्ट कालावधीत स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम


 सांगली  : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त दिनांक १२ मार्च २०२१ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत आजादी का अमृत महोत्सव" साजरा करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायम स्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दि. ११ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये देशभरात हर घर तिरंगा" हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. राज्य शासनामार्फत ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम, कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. सांगली जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, विविध आस्थापना, दानशूर व्यक्ती, नागरिक या प्रत्येकांनी आपल्या घरावर, आस्थापनेवर  दि. 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत  राष्ट्रध्वज फडकवावा त्याचबरोबर आपल्या इच्छेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रध्वज दान करावा, जेणेकरून जे लोक राष्ट्रध्वज खरेदी करू शकणार नाहीत त्यांना तो देण्यात येईल. सर्वांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आपले योगदान देवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात हर घर तिरंगा उपक्रम राबविण्याबाबतची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक दिक्षीम गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, शासकीय अधिकारी,  विविध आस्थापना, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आदि उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी दि. ११ ते १७ ऑगस्ट २०२२ कालावधीत प्रत्येक शासकीय / निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी नागरीकांना प्रोत्साहीत करावे. केंद्रिय गृह विभागाच्या दि. ३० डिसेंबर २०२१ रोजीच्या अधिसूचनेन्वये भारतीय ध्वज संहिता २००२ भाग-१ मधील परिच्छेद १.२ मधील राष्ट्रध्वज हे "हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर/सुत/सिल्क/खादी कापडापासून बनविलेला असेल", या तरतूदीमध्ये बदल करण्यात आला असून सदर बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सुत / पॉलिस्टर/ लोकर/ सिल्क/खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत असा उल्लेख केला आहे. या बदललेल्या तरतूदीनुसार तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर या प्रयोजनासाठी करता येईल. भारतीय ध्वज संहितेचे पालन व्हावे व जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी.

 शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कमीत कमी पाच राष्ट्रध्वज प्रत्येकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दान स्वरूपात सुपूर्द करावेत. विविध आस्थापना, सामाजिक संस्था यांनीही यामध्ये पुढाकार घेवून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करावेत, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, ज्या आस्थापना स्वत:हून त्यांच्या क्षेत्रात राष्ट्रध्वज लोकांना देवू इच्छितात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्याबाबतची अगोदर सूचना देवून वाटप करावे. जेणेकरून योग्य समन्वय साधून गरजू लोकांना राष्ट्रध्वजाचे वाटप होईल. राष्ट्रध्वज हा एक फूट x दीड फूट किंवा दोन फूट x तीन फूट आकारात असावा. राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखून त्याचा अवमान होणार नाही याची खबरदारी प्रत्येकांनी घ्यावी. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या उपक्रमात सर्वांनी हिरीहिरीने सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनामार्फतही जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर स्वराज्य महोत्सव दिनांक 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार असून त्याबाबतही संबंधित विभागांनी तयारी करावी, असे आदेश देवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, स्वराज्य महोत्सवाअंतर्गत जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांचे सुशोभिकरण करण्यात यावे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये विशेष सभांचे आयोजन करणे, जिल्ह्याच्या ठिकाणी तिरंगा बलून सोडणे, जिल्ह्यातील अनाम वीर स्वातंत्र्य चळवळतील हुतात्मे यांचे दुर्मिळ फोटो व त्यांच्या कार्याची माहिती गावातील रस्त्याच्या कडेला लावण्याबाबत नियोजन करावे. तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी शासनाच्या सूचनाप्रमाणे उंच राष्ट्रध्वज उभारण्याबाबत संबंधित विभागांनी कार्यवाही करावी, असे निर्देशित करून जिल्ह्यामध्ये विविध स्पर्धांचे यामध्ये प्रामुख्याने निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करावे. जिल्ह्यातील एैतिहासीक वारसा स्थळा ठिकाणी पदयात्रांचे आयोजन करावे. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करावे. तसेच महत्वाच्या स्थळांची स्वच्छता मोहिम तसेच तालुका, जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारण्याबाबत संबंधित विभागांनी प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी जितेंद्र डुडी म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सव यशस्वीपणे साजरा करण्यासाठी विभागवार समित्यांची निर्मिती करण्यात यावी. प्रशासनास दान स्वरूपात मिळणाऱ्या राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची खबरदारी घ्यावी. प्राप्त होणाऱ्या राष्ट्रध्वजांचे मागणीनुसार योग्य प्रकारे वितरण करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

 पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सवांतर्गत प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. या महोत्सवात राष्ट्रध्वजाचा अवमान होवू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. या कालावधीत अत्यंत सतर्क रहावे, असे आवाहन केले.

 महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रामध्ये 1 लाख 30 हजार घरे व संस्था असल्याची माहिती संकलीत केली आहे. या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज फडकविण्याबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला असून यामध्ये सोशल मीडियावर संदेश देण्यात येणार आहेत. तसेच स्टँडी तयार करण्यात येणार असून रेडिओवर जिंगल्स प्रसिध्द करण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात पथनाट्यांचे आयोजन करण्यात येणार असून विविध ठिकाणी सेल्फी पॉईंट निर्मिती करण्यात येणार आहे. याच कालावधीत रक्षाबंधनाचा सण साजरा होणार असून या सणाचे औचित्य साधून तिरंगी राखी ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

 प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सव उपक्रम राबविण्याबाबत शासनाच्या मागदर्शक सूचना, जिल्हास्तरावर राबविण्यात येणारे उपक्रम याबाबत सादरीकरण केले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात