ताजी बातमी

*गु. र. क्र. -* 953/2022 कलम 392 भा. द.वी.

 *_घडला दिनाक_-* 02.07.2022 रोजी 11.45 वा

 *दाखल दिनांक* - 02.07.2022 रोजी 15.53 वा

 *चोरीस गेली मालमत्ता -* अंदाजे 30 ग्राम वजनाची सोन्याची चैन किंमत अंदाजे 1 लाख रुपये

 *घटनास्थळ* -  निरंकारी गार्डन, वसरी हिल, मालाड वेस्ट, मुंबई

अटक आरोपीची माहिती - राजकुमार प्रल्हाद रस्तोगी, हि 29 वर्षे, रा. ठी. रूम न. 92, पास्कल कोरिया चाळ, धोलदेव मंदिरासमोर, सप्त रत्न टॉवर शेजारी, मालाड वेस्ट, मुंबई


गुन्ह्याची थोडक्यात हकीगत

        मालाड पोलिस ठाणे C.R.No. 953/2022 कलम 392 भा. द.वी. या गुन्ह्यातील फिर्यादी या दिनाक 02.07.2022 रोजी निरंकारी गार्डन, वासरी हिल, मालाड वेस्ट, मुंबई येथून पायी जात असताना एका अनोळखी इसमाने पायी चालत येऊन मागून फिर्यादी महिला हिच्या गळ्यातील 3 तोळे वजनाचे सोन्याची चेन जबरीने खेचून पळून गेला होता.

         तरी, आरोपीचा कोणताही पूर्वीचा रेकॉर्ड नसताना देखील मालाड पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि पथक  यांनी घटनास्थळचे आसपास चे जवळपास 50 ते 60 CCTV तपासून आरोपिबाबत सतत तपास करून आरोपी बाबत गुप्त बातमीदार कडून माहिती प्राप्त करून तसेच तांत्रिक तपास करून गुन्हा घडल्यापासून 48 तासाचे आतमध्ये आरोपीस ताब्यात घेतले, तसेच त्यास अटक करून गुन्ह्यात चोरीस गेलेली मालमत्ता 30 ग्राम सोन्याची चैन आरोपिताकडून हस्तगत केलेली आहे. 

         तरी  सदर आरोपीने मालाड परिसराच्या आसपास   देखील गुन्हे केले असण्याची शक्यता आहे तरी गुन्ह्यातील footage मध्ये सदरचा आरोपी दिसून येत असल्यास मालाड police ठाणे येथे संपर्क साधावा.


सदरची  कामगिरी मालाड पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि . सचिन कापसे, स.पो.ऊ.नि. जगदाळे, पो.ह.क्र. 33050/तोंडवळकर, पो.ह.क्र. 00.73/जुवटकर, पो.ना. क्र. 03.464/गावंड, पो. शि.क. 06.1862/काटे, पो. शि. क्र. 11.1918/राठोड, म पो शि 09.1260/गोम्स (झोन 11) यांनी पार पाडली.
धनंजय लीगाडे

वरीठ पोलिस निरीक्षक

मालाड पोलिस ठाणे, मुंबई

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात