ताजी बातमी

सन २०२० मध्ये १५ हजार ५८९, तर सन २०२१ मध्ये १४ हजार ३४८ पिशव्या रक्तसंकलन केल्याची घेण्यात आली राज्यस्तरावर दखल


सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री श्री. राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला सन्मान


शीव परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील रक्तकेंद्राला नुकताच महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण या खात्यांचे मा. मंत्री  राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन खात्यांचे मंत्री श्री. राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय रक्तदाता गौरव करण्यात आले आहे. सन २०२० मध्ये १६९ रक्तदान शिबिरे आयोजित करणे आणि १५ हजार ५८९ रक्त पिशव्यांचे संकलन; तर सन २०२१ मध्ये १५४ रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासह १४ हजार ३४८ पिशव्यांचे रक्तसंकलन केल्याची दखल राज्य स्तरावर घेण्यात येऊन हा सन्मान करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी दिली आहे.

दरवर्षी १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिन  असतो. यानिमित्ताने मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात असणाऱ्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमादरम्यान शिव रुग्णालयाच्या रक्तकेंद्राचा सन्मान करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर आशिष मिश्रा आणि संबंधित समुपदेशक श्रीमती सुनिता घमंडी यांनी हा सन्मान माननीय मंत्रीमहोदयांच्या हस्ते स्वीकारला. या कार्यक्रमाला राज्याच्या रक्तसंक्रमण परिषदेच्या संचालक डॉक्टर साधना तायडे आणि सहाय्यक संचालक डॉक्टर अरुण थोरात हे मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या रक्तसंक्रमण परिषदेद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते‌, अशी माहिती शिव रुग्णालयातील रक्तकेंद्राच्या प्रमुख डॉक्टर अंजली महाजन यांनी दिली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात