ताजी बातमी

रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून महाड ते दुर्गराज रायगड पर्यंत प्रशस्त महामार्ग साकारला जात आहे. या महामार्गावरून प्रवास करताना शिवकाळाचा अनुभव यावा, अशा पद्धतीचे स्वरूप या मार्गाला देण्यात यावे, तसेच पायथ्यापासून गडावरती जाण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचा सक्षम रोपवे उभारावा, यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. 


महाड ते दुर्गराज रायगड महामार्ग बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या काही महिन्यांतच ते पूर्णत्वास येईल. या महामार्गाचे स्वरूप हे सर्वसामान्य मार्गाप्रमाणे न ठेवता या मार्गावरील प्रवास शिवकाळाची अनुभूती देणारा असेल, या पद्धतीने आराखडा करण्यात येणार आहे. 


त्याचबरोबर, रायगड येथे सध्या अस्तित्वात असणारा रोपवे हा गडावर येणाऱ्या लोकांची संख्या हाताळण्यास सक्षम नाही. तसेच, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातूनही काही मुद्दे उपस्थित होतात. त्यामुळे नवीन सक्षम व अत्याधुनिक रोपवे उभारण्याबाबत देखील यावेळी सकारात्मक चर्चा झाली. 


नामदार गडकरीजी दोन्ही प्रकल्पांबाबत सकारात्मक असून याबाबत त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार रायगड विकास प्राधिकरण पुढील कार्यवाही लवकरच सुरू करीत आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात