ताजी बातमी

बृहन्मुंबई महानगरपालिकेने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळ्यापूर्वी नाल्यांतून गाळ काढणे व इतर कामे हाती घेतली आहेत. यावर्षी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे युद्ध पातळीवर सुरु आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांनी शहर भागातील नालेसफाई कामांची आज (दिनांक २१ एप्रिल २०२२) पाहणी केली.   


याप्रसंगी जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. किरण  दिघावकर, एफ/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. गजानन बेल्लाळे आणि पर्जन्य जलवाहिन्या खात्याचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.


अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांनी सर्वप्रथम सकाळी एफ/दक्षिण विभागातील वडाळा, शीव भागातील रावळी नाला, जे. के. केमिकल नाला, महानगर गॅस पाईपलाईन नाला, प्रतीक्षा नगर नाला, पेरीफेरी नाला या मोठ्या व छोट्या नाल्यांची पाहणी केली. तर दुपारी जी/उत्तर विभागातील धारावी परिसरातील निसर्ग पार्क उद्यानालगत असलेला मोठा नाला, नाईक नगर नाला, बुद्धनगर नाला आणि काळा किल्ला नाला येथील कामांची पाहणी केली.    


डॉ. संजीव कुमार यांनी नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले. प्रशासनाने निर्धारित केलेल्या वेळेत आणि गुणवत्तापूर्णरित्या कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱयांना त्यांनी दिले.

 



सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात