ताजी बातमी

जसलोक रुग्णालयाच्यावतीने सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत उपक्रम


१८ ते ५९ वर्ष वयोगटातील सर्व पात्र नागरिकांना लाभधारावीतील शास्त्रीनगर-२ कोविड लसीकरण केंद्रावर सोमवार दिनांक २५ एप्रिल २०२२ पासून कोविड १९ लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (बूस्टर डोस) १८ ते ५९ वर्ष वयोगटातील सर्व पात्र नागरिकांना विनामूल्य दिली जाणार आहे. जसलोक रुग्णालयाच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत या केंद्रावर हा उपक्रम राबवला जाणार आहे. मुंबईतील इतर खासगी रुग्णालयांनी देखील सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून अशा प्रकारचा प्रयत्न करावा आणि कोविड लसीकरणाच्या राष्ट्रीय उपक्रमास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात येत आहे. 


केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून कोविड - १९ या आजाराकरीता प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. महानगरपालिका व शासकीय रुग्णालयात १२१, खासगी रुग्णालयात १२७ अशी एकूण २४८ कोविड - १९ लसीकरण केंद्रे सध्या कार्यान्वित आहेत. मुंबईत आतापर्यंत १ कोटी ०७ लाख २२ हजार १८४ पात्र लाभार्थ्यांना (१०५ टक्के) पहिली मात्रा व ९५ लाख ४४ हजार ३२८ एवढ्या पात्र लाभार्थ्यांना (९३ टक्के) दुसरी मात्रा देण्यात आली आहे.  

 

केंद्र शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनेनुसार, आरोग्‍य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे कर्मचारी व ६० वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक यांना दिनांक १० जानेवारी २०२१ पासून कोविड लसीची प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येत आहे. आतापर्यंत ४ लाख ८५ हजार २७७ (५८ टक्के) एवढ्या लाभार्थ्यांना प्रतिबंधात्मक मात्रा देण्‍यात आली आहे. त्‍याचप्रमाणे खासगी रुग्णालयांमध्‍ये १८ ते ५९ वर्षे वयोगटातील सर्व पात्र नागरिकांना दिनांक १० एप्रिल २०२२ पासून कोविड लसीची सशुल्‍क प्रतिबंधात्मक मात्रा देण्‍यात येत आहे. 


जागतिक पातळीवर विविध देशात पुन्हा वाढीस लागलेली कोविड बाधित रुग्‍णांची संख्‍या, कोविड विषाणूचे आढळणारे नवनवीन उपप्रकार या सर्व पार्श्वभूमीवर कोविड लसीकरण मोहिमेवर अधिकाधिक लक्ष केंद्रीत केले जात आहे. 


त्यास हातभार म्हणून आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा (CSR) भाग म्हणून धारावीमधील महानगरपालिकेचे शास्त्री नगर-२ नागरी आरोग्य केंद्र येथील लसीकरण केंद्र, एसएच-६, ट्रान्झिट कॅम्‍प, एम.जी. मार्गाजवळ, हुसेनिया मस्जीद मागे, ९० फूट मार्ग, धारावी या केंद्रावर जसलोक रुग्‍णालय व रिसर्च सेंटरतर्फे दिनांक २५ एप्रिल २०२२ पासून कोविड लसीचा बूस्टर डोस १८ ते ५९ वर्ष वयोगटातील सर्व पात्र नागरिकांना विनामूल्य देण्‍यात येणार आहे. जास्‍तीत-जास्‍त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्‍यावा. तसेच मुंबईतील इतर खासगी रुग्‍णालयांनी देखील सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत विनामूल्य कोविड लसीकरणासाठी प्रयत्‍न करावेत, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात