ताजी बातमी

नालेसफाईच्या कामात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी भरारी पथके तैनात करण्यासह वेळोवेळी गाळ मोजण्याचे व गाळ मोजताना त्याचे व्हिडिओ छायाचित्रण करण्याचे निर्देश

महानगरपालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल यांचा नालेसफाई कामांचा पाहणी दौरा


बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे तीनशे चाळीस किलोमीटर लांबीच्या मोठ्या व छोट्या नाल्यांची आणि नद्यांची पावसाळा-पूर्व साफसफाई अधिक योग्य प्रकारे व वेळेत व्हावी, यासाठी नालेसफाईची कामे ही दरवर्षीप्रमाणे एका शिफ्टमध्ये न करता यंदा प्रथमच दोन पाळ्यांमध्ये करण्याचे  निर्देश महानगरपालिका आयुक्त श्री इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. तसेच नालेसफाईच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने भरारी पथके तैनात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. नालेसफाई नंतर काढण्यात आलेला गाळ उचलण्यापूर्वी व निर्धारित ठिकाणी गाळ टाकण्यापूर्वी; अशा दोन्ही वेळी गाळाचे वजन करण्यासह दोन्ही वेळी व्हिडीओ छायाचित्रण देखील करण्याचेही निर्देश महानगर पालिका आयुक्तांनी आज महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सध्या वेगाने सुरू असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी आज महानगरपालिका आयुक्तांनी केली. त्याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

..

यावेळी मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री पी. वेलरासू, संबंधित उपायुक्त श्री. उल्हास महाले, संबंधित अधिकारी व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

...

येत्या पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या आजच्या पाहणी दौरा दरम्यान

मा. महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी सर्वप्रथम मिठी नदीतील साफसफाई कामांसह संबंधित कामांची पाहणी केली. या अंतर्गत वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील 'बीकेसी कनेक्टर ब्रिज' नजिकच्या 'कॅनरा बॅंक' कार्यालयासमोरील मिठी नदी येथे सुरु असलेल्या कामांची त्यांनी पाहणी केली. यानंतर त्यांनी धिरुभाई अंबानी शाळेजवळील मिठी नदीच्या पात्रात आधुनिक यंत्र सामुग्रीच्या मदतीने सुरू असलेल्या साफसफाई कामांची पाहणी केली.

...

आजच्या दौऱ्यादरम्यान वांद्रे पूर्व परिसरातील उत्तर भारतीय संघ भवन जवळ असणाऱ्या वाकोला नदी मध्ये सुरू असलेल्या साफसफाई कामांचीही त्यांनी पाहणी केली. तर आजच्या दौऱ्याच्या शेवटी वांद्रे पूर्व परिसरातील 'वांद्रे टर्मिनस' नजीक असणाऱ्या वाशी नाका नाला येथील कामांची त्यांनी पाहणी केली.  या सर्व कामांच्या प्रगतीबद्दल महानगरपालिका आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. तथापि कामांची गती अधिक वाढण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी दोन शिफ्टमध्ये काम करवून घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित खात्यास दिले. तसेच पूर्व निर्धारित वेळापत्रकानुसार नालेसफाईची पावसाळापूर्व कामे ही ३१ मे २०२२ पूर्ण करण्याचे लेखी आदेश यापूर्वीच देण्यात आले असले, तरी देखील सदर कामे १५ मे २०२२ पूर्वी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवावे, अशाही सूचना त्यांनी संबंधित खात्यास आजच्या दौऱ्यादरम्यान दिल्या आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात