कोल्हापूरच्या खासबाग कुस्ती मैदानाच्या विकासाकरिता केंद्रातून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची दिल्ली येथे भेट
६ मे रोजी राजर्षी शाहू छत्रपती महाराजांची स्मृतीशताब्दी आहे. या निमित्ताने महाराजांनी कुस्तीच्या वृद्धीसाठी उभे केलेल्या खासबाग कुस्ती मैदानाचे पुनरूज्जीवन करणे गरजेचे आहे. याबाबत आज क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना सविस्तर माहिती दिली.
यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या मैदानाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून सविस्तर आराखडा मागवून घेऊ व त्यानुसार आवश्यक तितक्या निधीची तरतूद करू, अशी ग्वाही दिली.
याआधी मी कोल्हापूरातील हॉकी स्टेडियमसाठी केंद्रातून साडे पाच कोटी रूपये निधी आणलेला आहे. या निधीतून हॉकी स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकासकाम सुरू आहे. राज्य शासनाने खासबाग मैदान बाबत देखील आवश्यक प्रस्ताव तातडीने दिल्यास, 'छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व' निमित्त दोन्ही मैदानांच्या विकासकामांचे उद्घाटन एकत्रित करता येईल, असेही यावेळी मंत्री महोदयांनी सूचित केले.