ताजी बातमी

लॉक डाऊन च्या काळात आणि शनिवारी-रविवारी दुकाने विविध आस्थापना यांना पूर्णतः बंद हे निर्बंध असतानादेखील ठाण्यामध्ये या निर्बंधाचे उल्लंघन करून तब्बल डझनभर लेडीज  डान्स बार सुरू असल्याचे स्टिंग ऑपरेशन वृत्तवाहिनीने केल्यानंतर ठाण्यात एकच खळबळ उडाली. या पकरणी दोषींवर कारवाईचे संकेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्यानंतर आता ठाण्यातील दोन व.पो.नि. आणि दोन सहाय्यक पोलिस आयुक्त यांच्यावर कारवाई केल्याची सुत्रांची माहीती आहे.

     ठाण्यातील तीन पेट्रोल पंप या परिसरात असलेला अँटिक पॅलेस तर ठाण्याच्या गडकरी रंगायतन जवळच असलेले आम्रपाली, नटराज अशा तब्बल डझनभर लेडीज डान्स बार चे स्टिंग ऑपरेशन या तीन दिवसांमध्ये केल्यानंतर त्याचा गौप्यस्फोट हात झाला शनिवार आणि रविवारी लोक डाऊन च्या नियमानुसार सर्व आस्थापना किराणा दुकाने अन्य दुकाने बंद असताना मात्र डान्सबार सुरू असल्याने ठाणेकरांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


पुढून दरवाजा बंद ......ग्राहकांना मागून एन्ट्री


    लोक डाऊन मुळे डान्सबारवर आलेल्या बंदीनंतर ही ठाण्यामध्ये सर्रासपणे डान्सबार सुरू असल्याचं स्टिंग ऑपरेशन ने समोर आले आहे. मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवून ग्राहकांना तपासणी करून पोलिस किंवा पत्रकार नसल्याची खात्री करून मागच्या दरवाजाने एन्ट्री  देऊन डान्स बार जल्लोषात सुरू होता. ठाण्यातील पेट्रोल पंप येथील अँटिक पॅलेस गडकरी रंगायतन सर्कल जवळील आम्रपाली नटराज अशा डझनभर डान्स बार लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन करीत सुरूच असल्याचं स्टिंग ऑपरेशनने समोर आल्यानंतर आता हे डान्सबार कुणाच्या संरक्षणात चालतात याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे या स्टिंग ऑपरेशन चा गौप्यस्फोट झाल्याने आता डान्स बार सुरू असलेल्या परिसरातील काही जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे.


संबंधित अधिकाऱ्यांवर कडक

 कारवाईचे आदेश - गृहमंत्री


लॉक डाऊन मध्ये बंदी असताना अशा प्रकारे राजरोसपणे डान्सबार चालू होते. या घटनेचा खुलासा झाल्याने ही गंभीर बाब असून दोषींवर कडक कारवाईचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिस महासंचालक यांना दिले आहेत. अशा गैलू त्यात कुणालाही माफ केले जाणार नाही. गृहमंत्र्यांच्या या संकेता नंतर आता ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये डान्स बार सुरू होता. त्या पोलीस ठाण्यातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे.


      राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस महासंचालकांना सदर डान्स बार बाबत सविस्तर अहवाल सादर करून दोषींवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ठाण्यात ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे डान्सबार सुरू होते त्या पोलिस ठाण्याच्या ‌ दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे तर दोन सहाय्यक पोलीस आयुक्त यांची तात्काळ बदली करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात