ताजी बातमी

वाशिम  : कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासन नियमांच्या अधीन राहून जिल्ह्यात खासगी रुग्णालयांमध्ये डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल व डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली होती. मात्र, सध्या कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने काही रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. अशा १४ खासगी रुग्णालयांमध्ये आता नॉन-कोविड रुग्णांवर उपचार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १६ जून रोजी निर्गमित केले आहेत.


या आदेशानुसार वाशिम येथील वाशिम डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल, माँ गंगा मेमोरियल कोविड हॉस्पिटल, रेनॉल्ड हॉस्पिटल, गाभणे हॉस्पिटल, नाथ हॉस्पिटल, वरद हॉस्पिटल, कानडे हॉस्पिटल, गुरुकृपा हॉस्पिटल, धन्वंतरी हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल, बालाजी हॉस्पिटल, बजाज हॉस्पिटल, जैन भवन हॉस्पिटल व रिसोड येथील सिटी केअर कोविड हॉस्पिटल ही १४ खासगी रुग्णालये आता नॉन-कोविड रुग्णांवर उपचारासाठी खुली करण्यात आली आहेत. या सर्व रुग्णालयांच्या व्यवस्थापकांनी परवानगीच्या कालावधीत भरती असलेल्या कोविड रुग्णांच्या अभिलेखांची जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे गठीत करण्यात आलेल्या पथकाकडून तपासणी करून घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात