ताजी बातमी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भिवंडी येथील महात्मा ज्योतिबा फुले नगर क्रमांक एकच्या रहिवाशांनी केली आहे. याबाबत त्यांनी भिवंडी तहसीलदारांना एक निवेदन दिले आहे. 

परभणी येथील खर्डा गावातील शिवसेनेचे सरपंच दगडू पाटील यांनी काही बौद्ध समाजातील महिलांना जातीवाचक वक्तव्य करीत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणावरून दलित समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. पोलिसांनी अद्याप या प्रकरणात सरपंच दगडू पाटील यांच्यावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे दगडू पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भिवंडी येथील महात्मा ज्योतिबा फुले नगर क्रमांक एकच्या रहिवाशांनी केली आहे. याबाबत त्यांनी भिवंडी तहसीलदारांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. यावेळी विनोद आरकडे, तेजेस पाटेकर, मिरेश उजगरे, दीपक वाघमारे, राजहंस धिवार, अभिजित सूर्यवंशी उपस्थित होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात