ताजी बातमी

ऑक्सिजन बँक योजनेअंतर्गत राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघास एक लाख रुपये किंमतीचे अमेरिकन बनावटीचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र आज भेट दिले.

कोरोनाच्या संकटाच्या काळात संघाच्या सदस्यांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना घरी ऑक्सिजनची गरज भासल्यास सदर यंत्र वापरता येईल. हे यंत्र आता पत्रकार संघात उपलब्ध आहे. हे उपयुक्त यंत्र दिल्याबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र विश्वनाथराव वाबळे आणि कार्यवाह विष्णू सोनवणे यांनी शिंदे पिता- पुत्रांचे आभार मानले आहेत. तसेच पत्रकार संघापर्यंत हे यंत्र आवर्जून पोचविल्याबद्दल ना.एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी मंगेश चिवटे यांनाही धन्यवाद दिले आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात