ताजी बातमी

शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क प्राप्त झालेला आहे. प्रत्येकाला शिक्षण मिळालेच पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे कोव्हीड 19 च्या प्रार्दुभावाने शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याच्या शालेय फी संदर्भात  फारच मोठा प्रश्न निर्माण झाला होता. 

कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांचे शालेेय शुल्क भरणेे पालकांना आर्थिक संकटामुळे शक्य झाले नाही. या संदर्भात अनेक तक्रारी शालेय शिक्षण विभाग व शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडेे आल्या होत्या. यामुळेेेेेे शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्स्तियाज काझी  यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करण्यात आली. यासंदर्भात  शालेय शिक्षण विभागाची बैठक आज पार पडली. या बैठकीला पालक शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी सुनील चौधरी, अँड. अरविंद तिवारी, सुनीता देशपांडे, जितेंद्र जैन उपस्थित होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालेच पाहिजेे, शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली  कोरोनाच्या काळात अनेक  पालकांचे रोजगार गेले, नोकरी व्यवसाय मधील आर्थिक नुकसानीमुळे शाळा व्यवस्थापन व पालक यामध्येे संघर्ष निर्माण झाला. या पालकांना दिलासा देण्यासाठी एका कमिटीची स्थापना करण्यात आली आहे त्यामुळे पालक शिक्षक, शाळा व्यवस्थाथापन यात समन्वय साधला जाणार आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात