कमिशनर साहेब ग्रेटच ! पाठीवर हात ठेऊन आता फक्त लढ म्हणा !!
अब्राहम लिंकन स्वतः युद्धभूमीवर जाऊन आपल्या अधिकाऱ्यांचे आणि सैन्यांचे कौतुक करुन प्रोत्साहन द्यायचे तर काहींना स्वतः पत्र लिहून संदेश पाठवायचे व त्यांच्या शौर्याचा गौरव करायचे...हे सांगण्याचे तात्पर्य एवढंच की अंगी ते सदगुण असावे लागतात... पदामुळे उंची वाढते पण आपल्या स्वभावाने आणि कर्तृत्वाने त्या पदाची उंची वाढविणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल निश्चितच मनात आदर वाटत़ो...ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याबद्दल ही असाच आदर त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांत आहे.
नुकतेच राबोडी पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस उपनिरीक्षक भगतराव साळुंखे ७० दिवस चाललेल्या कोरोना विरुद्धच्या लढाईतून विजयी होऊन सुखरुप घरी परतले... भगतराव साळुंखे यांना व त्यांच्या परिवाराला भेटून प्रोत्साहन दिले व मायेच्या आधाराने सर्वांशी संवाद साधला...यावेळी DCP भुरसे , ACP निलेवाड वागळे इस्टेट विभाग,पी आय राजेंद्र शिरतोडे राबोडी पो.स्टे.,पी.आय.दत्ता ढोले, वागळे इस्टेट पो.स्टे. व पोलीस स्टाफ उपस्थित होते.
आपले
एस.एल.पाटील/ किशोर पाटील
ठाणे ग्रामीण पोलीस.