ताजी बातमी

कोरोना(कोविड-१९) संकट काळात टाटा ग्रुपने हजारो कोटी रुपयांची मदत केली असताना आज पुन्हा एकदा मदतीचा हात मुंबई महानगरपालिकेला दिला. मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता  मुंबई महापालिकेला टाटा सन्सने प्लाझ्मा थेरपीसाठी लाखमोलाची मदत दिली. सदर मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. 

    मुंबई महानगरपालिका अंतर्गत आरोग्य सेवा अधिक भक्कम करण्यासाठी मुंबई मनपा आणि टाटा समुह यांच्या संयुक्त विद्यमाने प्लाझ्मा थेरपी प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत टाटा समूहातर्फे  मुंबई महानगरपालिकेला २० रुग्णवाहिका, १०० व्हेंटिलेटर्स व १० कोटी रुपयांची अर्थिक मदत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली. या प्रसंगी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात