ताजी बातमी

कोरोना(कोविड - १९) संकट काळात माणुसकी हरपल्याची अनेक उदाहरण पाहावायास मिळाली. मात्र पहिल्या दिवसांपासून पोलीस स्वत:च्या जिवाची परवा न करता कोरोना संकट काळात कर्तव्य बजावत आहेत. कौतुकास्पद बाब म्हणजे कर्तव्य बजावताना पोलिसांनी माणुसकी जपून खात्याची प्रतिमा आणखी उजळवली. त्या पोलिसांपैकी एक आहेत पोलीस शिपाई (बक्कल नं.०७०४४१) गौतम तुकाराम चव्हाण (वय ३९)! पत्नी, १५ वर्षीय मुलगा व १३ वर्षीय मुलगी यांच्यासोबत राहणारे पोलीस शिपाई गौतम चव्हाण हे गेल्या ३ महिन्यांपासून जे जे रुग्णालयातील कोरोना ओपडीत स्वत:च्या जिवाची बाजी लावून कर्तव्य बजावत आहेत. 

     कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात २३ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्या दिवसांपासून जे जे मार्ग पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई गौतम चव्हाण हे जे जे रुग्णालयातील कोरोना ओपडीत कर्तव्य बजावत आहेत. कोरोना संकट काळात कर्तव्य बजावताना हजारो संख्येत पोलिसांना कोरोनाची लागण झाली. परिणामी जे जे रुग्णालयात येणाºया पोलिसांना व त्यांच्या कुटुंबीयांना पोशि गौतम चव्हाण यांनी वेळोवेळी मदत केली. त्यावेळी मनात कसल्याही प्रकारची भीती न बाळगता काळजीपूर्वक मदत करून पोशि गौतम चव्हाण यांनी माणुसकी जपली. 

     दरम्यानच्या काळात कर्तव्य बजावताना जे जे मार्ग पोलीस ठाण्यातील १२ पोलीस अधिकारी व ४४ अंमलदारांना कोरोनाची लागण झाली. हे पडल्यानंतरही न डमगता, एकही दिवस सुटी न घेता आजपर्यंत पोशि गौतम चव्हाण कर्तव्य बजावत आहेत. कोरोना ओपडीत कर्तव्य बजावत असल्यामुळे पोलीस शिपाई गौतम चव्हाण यांनी दोन वेळा कोरोनाची तपासणी केली मात्र त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. एकूणच पोशि गौतम चव्हाण यांच्या कर्तव्याची दखल घेऊन शासनाने त्यांना ३ हजार रुपयांचे बक्षीस व दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त निशीथ मिश्र यांनी सन्मानपत्र देऊन गौरव केला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात