ताजी बातमी

काल धारावीत एक कोरोना बाधित ऋग्ण आढळल्याने सर्वत्र चिंतेचे व घबरटीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आज धारावी येथील  परिस्थितीची पाहणी केली.  डीसीपी, धारावीचे दोन्ही वरीष्ठ पोलिस निरीक्षक, पुरवठा अधिकारी उपस्थित कोरोनाच्या नियंत्रणासाठीमहत्वाची बैठक घेवुन सूचना दिल्या. संबंधित अधिका-यांना लॉकडाउनची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यासाठी निर्देश दिले आहेत. धारावीवासियांनी घाबरून जाऊ नये. प्रशासनाला आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्यत्या सूचना दिल्या आहेत. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या महत्वाच्या बैठकीस धारावीचे नगरसेवक हाजी बबूखान, भास्कर शेट्टी, जियाउद्दीन शेख, हरगोपाल कृष्णन, मायकल गुणवंत, व्यंकटेश पिल्लै, शंकर संगम, परवेज अहमद आदि कार्यकर्ते उपस्थित होते. आपणा पुन:श्च निवेदन करते की शासन-प्रशासनाला सहकार्यकरा.शासनाच्या सूचनांचे पालन करा व आपण घराच्या बाहेर पडू नका.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात