ताजी बातमी

मुंबई महापालिकेच्या शाळांतील पहिली आणि दुसरीच्या पन्नास टक्के विद्यार्थ्यांना अक्षर आणि अंकओळख नसल्याचे पायाभूत चाचणीतून समोर आले आहे. पहिलीपासून इंग्रजीचे शिक्षण सुरू होऊन अनेक वर्षे झाली तरी, तिसरी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांना अद्यापही इंग्रजीतील साधी सोपी वाक्ये वाचता येत नाहीत.

पालिका आणि प्रथम फाऊंडेशनने हाती घेतलेल्याचला शिकू याया प्रकल्पांतर्गत पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या अध्ययनक्षमता जाणून घेण्यासाठी पायाभूत चाचणी घेण्यात आली. शिक्षण विभागाने शाळांना वाटलेल्या अध्ययन निष्पत्तीचे तक्ते आणि पत्रके ही फक्त शोभेलाच असल्याचे या वेळी दिसून आले.

२५ सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली होती. त्यानुसार सरासरी ४६ टक्के मुलांनाच देवनागरी अक्षरे ओळखता येतात, ३९ टक्के विद्यार्थ्यांना अंकओळख आहे. २९ टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजीतील मोठी अक्षरे (कॅपिटल लेटर्स) ओळखता आली. तिसरीच्या ६५ टक्के विद्यार्थ्यांना उतारा किंवा गोष्ट वाचता आली तर ७३ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी आणि भागाकाराचे गणित आले. केवळ ३७ टक्के विद्यार्थी इंग्रजी वाक्य वाचू शकले तर त्यातील ३० टक्केच विद्यार्थ्यांना त्याचा अर्थ कळला.

९४३ शाळांमध्ये चाचणी : शहराचे बारा विभाग करून पालिकेच्या ९४३ शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये गोरेगाव, अंधेरी, सांताक्रूझ विभागातील स्थिती चांगली आहे. मात्र चेंबूर, कुर्ला, भायखळा विभागांमध्ये अधिक कामाची गरज असल्याचे शिक्षण विभागाने नमूद केले आहे. पहिली आणि दुसरीच्या ४९ हजार १९५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

प्रशिक्षण कार्यक्रम : विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्तीनुसार कौशल्ये आत्मसात करावित यासाठी पालिका शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहे. त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात आणखी एक चाचणी घेण्यात येईल. जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात या प्रकल्पातील शेवटची परीक्षा घेण्यात येईल. मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना काय यावे, याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. प्रथम संस्थेचे स्वयंसेवक, विशेष शिक्षक या शाळांना पंधरा दिवसांतून एकदा भेट देतील. शिक्षकांच्या शंकाचे निरसन या वेळी करतील.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात