ताजी बातमी

मुंबई: महाराष्ट्रात काही अटींवर डान्स बार सुरू ठेवण्यास परवानगी असली आहे. मात्र,  मालाडमधील एका बारवर छापा टाकून पोलिसांनी 22 जणांवर कारवाई केली. बारबाला अश्लील नृत्य करताना आढळून आल्याचेही या कारवाईत समोर आले आहे.

मिळालेली माहिती अशी की, मालाड येथील एक जुन्या प्रसिद्ध मंदिराजवळ सुरू असलेल्या काका बार आणि रेस्टॉरंटवर पोलिसांनी शनिवारी पहाटे छापा टाकला. मालाड येथील पोलादर रोडवरील लक्ष्मी नारायण मॉलमध्ये हा बार आहे. पोलिसांनी या कारवाईत 93 हजार 930 रुपयांसह म्युझिक सीस्टिम जप्त केले आहे.

काका बार आणि रेस्टॉरंटमध्ये डान्स बार सुरु असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी पहाटेच्या सुमारास बारवर सापळा रचून छापा मारला असता 10 बारबाला अश्लील डान्स करताना आढळून आल्या. पोलिसांनी त्यांची सुटका करून तब्बल 22 जणांवर कारवाई केली. यात 14 ग्राहक, 5 कर्मचारी तसेच व्यवस्थापक, कॅशिअरचा समावेश आहे. सगळ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिपदीप लांडे यांनी दिली आहे. आरोपींवर दिंडोशी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोली पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात काही अटींवर डान्स बार सुरू ठेवण्यास परवानगी असली तरी असे प्रकार सुरू ठेवण्याची राज्य सरकारची इच्छा नाही. त्यामुळे पोलिसांची अशा 'डान्स बार'वर करडी नजर आहे.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात