ताजी बातमी

मुंबई: एका तरुणीने मोबाइलमध्ये तिच्या धाकट्या बहिणीचा न्यूड व्हिडिओ शूट करून तो आपल्या विवाहित बॉयफ्रेंडला दाखवल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे. अग्रीपाडा भागात ही घटना घडली असून पोलिसांनी 25 वर्षीय तरुणीला अटक केली आहे.

आरोपी तरुणीला तिच्या बॉयफ्रेंडने व्हिडिओ कॉल करून त्याने तिच्या धाकट्या बहिणीला नग्न अवस्थेत पाहण्याची मागणी केली होती. त्यानुसार तरुणीने आपल्या बहिणीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ मोबाइलमध्ये शूट करून बॉयफ्रेंडला दाखवला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी 20 वर्षाची असून ती भायखळा येथे आपल्या कुटुंबियांसोबत राहते. तिच्या थोरल्या बहिणीचे 4 वर्षांपूर्वी विवाहीत दिनेश नामक तरुणासोबत प्रेमसंबंध होते. धक्कादायक म्हणजे दिनेशला तीन अपत्ये आहेत. दरम्यान, दिनेशने आरोपी तरुणीला तिच्या धाकट्या बहिणीचे नग्न फोटो आणि व्हिडिओ पाठवण्याची मागणी केली होती. दिनेशने तरुणीला व्हिडिओ कॉल केला यावेळी तिची बहीण अंघोळ करत होती. तिने मोबाइलमध्ये बहिणीचा न्यूड व्हिडिओ शूट करून बॉयफ्रेंडला पाठवला.

पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. दिनेश फरार असून त्याच्या विरुद्ध भादंवि आणि आयटी कायद्यान्वये वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस दिनेशचा शोध घेत आहेत.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात