ताजी बातमी

मुंबईतील भेडी बाजार भागात असलेल्या एका इमारतीला भीषण आग लागली. पहाटे चारच्या सुमारास ही आग लागली. इस्माईल असं या इमारतीचं नाव आहे. पहाटे चारच्या सुमारास या इमारतीतील एका दुकानाला आगल लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी अथक प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवलं.

दरम्यान लागलेली आग ही इतकी भीषण होती की या इमारतीच्या जवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या १० बाईक आणि दोन कार यांचीही राख झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक पयत्न करुन ही आग आटोक्यात आणली.

 

 

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात