ताजी बातमी

टिळकनगर येथे ओसी (भोगवटा प्रमाणपत्र) घेता बांधलेल्या इमारतीत गेल्या वर्षी लागलेल्या आगीस कारणीभूत ठरलेल्या दोनपैकी एका फरारी आरोपीस अटक करण्यात आली आहे. गेल्या ११ महिन्यांपासून फरार असलेल्या दुकलीपैकी सुभक मापारा (६५) हा गुजरातमधील वलसाड येथे लपून बसल्याची माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांनी त्यास काही दिवसांपूर्वी अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

टिळकनगर येथे रिलायन्स रिअल्टर्सच्या भागीदारांकडून सरगम सोसायटी बांधण्यात आली होती. मात्र त्यासाठी पालिका वा म्हाडाकडून आवश्यक असलेले 'ओसी' घेण्यात आले नव्हते. २७ डिसेंबर रोजी २०१८ रोजी शॉर्टसर्किटने आग लागून पाच रहिवाशांचा मृत्यू ओढवला होता. या आगप्रकरणी पोलिसांनी हेमेंद्र मापारा, सुभक मापारा, मुकेश कोठारी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. त्यापैकी कोठारी यास पोलिसांनी अटक केली, तर अन्य दोघेही आरोपी फरार झाले.

त्या दोन्ही आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. पण पोलिसांना चकवा देण्यात दोघेही यशस्वी ठरत होते. सलग ११ महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या दोन्ही आरोपींपैकी सुभक मापारा यास पोलिसांनी वलसाडमधून अटक केली. मापारा हा वलसाडमध्ये लपून बसल्याची माहिती मिळताच टिळकनगर पोलिस ठाण्याचे पीएसआय सत्यवान बिले आणि पथकाने कारवाई केली.

 

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात