ताजी बातमी

गोरेगावच्या वासरी हिल परिसरात राहणाऱ्या दाम्पत्यावर गुरुवारी पहाटे दोन तरुणांनी क्षुल्लक कारणावरून चाकूहल्ला केला. या हल्ल्यात नंदलाल कनोजिया (४५) यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी उर्मिला ही गंभीर जखमी झाली. याप्रकरणी मालाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ल्यानंतर फरार झालेल्या आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

वासरी हिल येथील बाबासिंह चाळीमध्ये नंदलाल पत्नी आणि मुलासह राहत होते. त्यांच्या घरासमोरील खोलीमध्ये काही दिवसांपूर्वी दोन तरुण भाड्याने राहण्यास आले. या दोन तरुणांशी नंदलाल कुटुंबीयांचे वारंवार भांडण व्हायचे. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास नंदलाल आणि त्याची पत्नी पाणी भरण्यासाठी उठले. यावेळी नशेत असलेल्या तरुणाने त्यांच्या घराजवळ लघवी केली. याबाबत जाब विचारताच हा तरुण चिडला आणि घरातून चाकू आणून त्याने नंदलाल यांच्यावर वार केले. वाचविण्यासाठी आलेल्या उर्मिला यांनाही त्याने सोडले नाही. आरडाओरड ऐकून शेजारी जागे झाले. हे पाहून हल्लेखोराने त्याच्या साथीदारासह पळ काढला. नंदलाल आणि उर्मिला यांना शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. नंदलाल यांचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला तर उर्मिला यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे दोघे घटनास्थळावरून पळताना सीसीटीव्हीमध्ये दिसत असून त्याआधारे त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात