ताजी बातमी

साकीनाका विभागातील सहायक पोलिस आयुक्त कार्यालयात बुधवारी रात्री पोलिस कॉन्स्टेबल सुधीर गुरव यांनी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून गुरव यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

पवई पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सुधीर गुरव यांची काही दिवसांपूर्वी सहायक पोलिस आयुक्त कार्यालयात स्पेशल रायटर म्हणून नेमणुकीला होते. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मी कार्यालय बंद करतो असे सहकाऱ्यांना सांगून गुरव उशिरापर्यंत थांबले. सर्व सहकारी गेल्यानंतर गुरव कार्यालयाच्या वरील मजल्यावर गेले आणि शालने छताला गळफास लावून घेतला. सहायक पोलिस आयुक्तांचे चालक त्यांना घरी सोडून वाहन ठेवण्यासाठी कार्यालयात आले त्यावेळी त्यांना गुरव यांची बॅग दिसली. त्यांनी वरील मजल्यावर जाऊन पाहिले त्यावेळी ते लटकलेल्या स्थितीत आढळले. दोन्ही पोलिसांनी याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन गुरव यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी अगर लिखित स्वरूपात काही सापडल्याने गुरव यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात