ताजी बातमी

मुंबई:एका 32 वर्षीय विवाहितेला शेजारच्या व्यक्तीवर पतीपेक्षाही जास्त विश्वास ठेवणे चांगलेच महागात पडले आहे. पतीने वारंवार समजावूनही महिलेने गैरपुरुषासोबत जवळीकता वाढवली. अखेर जे व्हायचं नव्हतं तेच झालं. विवाहितेवर त्या नराधमाने अनेकदा बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने आरोपी अमजद खान (वय-30) याच्याशी फ्रेंडशिप केली होती. पीडिता पतीला खोटे सांगून आरोपीसोबत म्युव्ही पाहाण्यासाठी तसेच फिरायला जात होती. याचा फायदा घेत अमजदने तिच्या इच्छेविरोधात जाऊन तिच्यावर अनेकदा शरीर संबंध प्रस्थापित केले. अनेक महिने हा प्रकार सुरु होता.

अमजद सुरूवातीपासूनच पीडितेवर डोळा ठेऊन होता. संधी साधून त्याने महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवला होता. त्यावरून तो पीडितेला ब्लॅकमेल करत होता. एके दिवशी अमजदने महिलेला तिच्या अश्लील व्हिडिओचा स्क्रीनशॉट पाठवला. तो पाहून महिलेला धक्का बसला. त्यानंतर अमजदने महिलेवर ब्लॅकमेल करून वेगवेगळ्या ठिकाणी अनेकदा बलात्कार केला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात