शिवसेनेत प्रवेश करणार का? उर्मिला मातोंडकरांनी दिलं हे स्पष्टीकरण..
मुंबई: लोकसभेत
भाजपला टक्कर दिल्यानंतर उर्मिला मातेंडकर (Urmila Matondkar) यांची राजकारणातली एंट्री गाजली होती. त्यानंतर
सहा महिन्यांच्या आधीच त्यांनी मतभेदांमुळे पक्षातून राजीनामा दिला. त्यानंतर त्या शिवसेनेत(Shiv Sena) जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्याबाबतची बोलणी झाल्याचं म्हटलं गेलं. या सगळ्या चर्चेनंतर उर्मिला मातोंडकरांनी पहिल्यांदाच स्पष्टिकरण दिलंय. त्या म्हणाल्या, मी
इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करत नाहीये. उगाच त्याचे आडाखे बंधू नयेत. हे माझ्याप्रती आणि त्या पक्षासाठी अन्यायकारक आहे असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलंय. उर्मिलांनी
काँग्रेस श्रेष्ठींना पत्र पाठवून काही तक्रार केली होती. पण त्यावर उपययोजना न
करता उलट अशा लोकांना पदं दिली गेलीत असा आरोप करत त्यांनी काँग्रेसला(Congress) रामराम केला होता. महाराष्ट्र युवक काँग्रेसने उर्मिलांच्या मागण्यांना पाठिंबा देत त्यांची तक्रार योग्य असल्याचं म्हटलं होतं. तर मिलिंद देवरा यांनीही उर्मिलांना पाठिंबा दिला होता.