गोवंडीत विद्यार्थ्याकडून शिक्षिकेची हत्या?
खासगी
शिकवणी घेणाऱ्या २८
वर्षीय शिक्षिकेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक
घटना गोवंडीमध्ये सोमवारी सायंकाळी घडली.
ही हत्या तियाच्याकडे
शिकण्यासाठी येणाऱ्या इयत्ता
सातवीतील विद्यार्थ्याने केल्याचा संशय असून गोवंडी पोलिसांनी
त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पतीने
घटस्फोट दिल्यानंतर उदरनिर्वाहासाठी गोवंडीत राहणारी
आयेशा हुशी ही
खासगी शिकवणी घेत
होती. अनेक
मुले तिच्याकडे शिकवणीसाठी येत. सोमवारी
सायंकाळी शिकवणी संपल्यानंतर
आयेशा घरातच मृतावस्थेत
आढळली.
शिकवणीसाठी आलेल्या मुलांची
चौकशी केल्यानंतर एका सातवीच्या विद्यार्थ्यावर पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी
त्याला याप्रकरणात अद्याप अटक केली
नसली तरी या
घटनेमुळे शिवाजीनगर गोवंडी परिसरात खळबळ
उडाली आहे.