ताजी बातमी

चार सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत गोरेगावमध्ये तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्याचे काम करत असताना जगदीश परमार (५४) आणि विजेंद्र बागडी (४०) या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका वारसाला महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले आहे. तसेच नियमानुसार कर्मचाऱ्यांची देणी देण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत.

मुंबईत मागील आठवड्यात झालेल्या धुवांधार पावसात मुंबईकरांच्या सुविधेसाठी पालिकेचे ३२ हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत होते. चार सप्टेंबर रोजी गोरेगाव परिसरात तुंबलेल्या पाण्याचा निचरा करताना जगदीश परमार यांचा मृत्यू झाला. तसेच पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगार विजेंद्र बागडी हे तोल जाऊन वाहत्या पाण्यात पडल्याने मृत पावले. या कामगारांच्या वारसांना पालिकेत नोकऱ्या देण्याची मागणी कामगार संघटना गोरेगावच्या मोतीलाल नगर विकास समितीने केली होती.

पालिका आयुक्तांनी ती मान्य केली असून सह आयुक्त अशोक खैरे पी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव आणि घन कचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अभियंता अशोक यमगर यांनी सप्टेंबर रोजी परमार आणि बागडी यांच्या कुटुंबातील एका वारसाला नोकरीचे नियुक्ती पत्र आणि सफाई कामगार विमा योजनेंतर्गत रुपये एक लाख रकमेचा धनादेश सुपूर्द केला. पालिका प्रशासन त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे, असे खैरे यांनी सांगितले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात