ताजी बातमी

शेजाऱ्याच्या अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला सातव्या मजल्यावरून फेकून दिल्याने त्या चिमुरडीचा जागीच दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक हृदयद्रावक घटना शनिवारी रात्री उशिरा कुलाबा येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

कुलाबामधील रेडिओ क्लबजवळच्या अशोका टॉवर इमारतीत ही घटना घडली असून, अधिक तपशील हाती आला नसल्याचे कुलाबा पोलिस ठाण्यातील पोलिसांनी सांगितले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीला तातडीने जी. टी. रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला उपचारांसाठी दाखल करून घेण्यापूर्वीच मृत घोषित केले. 'या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदवला असून आरोपीला अटक केली आहे. अधिक चौकशी करण्यात येत आहे', असे पोलिस उपायुक्त (परिमंडळ ) संग्रामसिंह निशाणदार यांनी सांगितले.    

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात