ताजी बातमी

मुंबईखेरवाडी भागात खड्डय़ांमुळे रिक्षा उलटल्याने शुक्रवारी सकाळी एका रिक्षाचालकाला जीव गमवावा लागला तर दोघे प्रवासी जखमी झाले.

अंधेरी येथील जुहू गल्ली येथे राहणारे पंचमलाल निर्मल (४७) सकाळी आठच्या सुमारास प्रवासी घेऊन खेरवाडी येथील सेवा रस्त्यावरून जात होते. बालाजी गॅरेजजवळील एका खड्डय़ामध्ये रिक्षाचे पुढचे चाक गेले. त्यामुळे तोल सावरत असतानाच गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटली. या अपघातामध्ये रिक्षाचालक निर्मल यांच्या डोळ्याला, हाताला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. त्यांना सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

निर्मल त्यांच्या मित्रासोबत राहत होते. वीस वर्षांहूनही अधिक काळ ते रिक्षा चालवत होते. त्यांच्यामागे पत्नी आणि तीन मुली असा परिवार असून ते उत्तर प्रदेश येथे राहतात. निर्मल यांच्यासह रिक्षातील दोन प्रवाशांनाही मार लागला असून ते खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. रिक्षा उलटल्याने त्यांचे शरीर पूर्णत: दबले गेले. त्यामुळे त्यांना छातीसह अनेक ठिकाणी मार लागला होता. उपचार करतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे व्ही.एन. देसाई रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजश्री जाधव यांनी सांगितले. निर्मल याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लोकमान्य टिळक रुग्णालयात दीडच्या सुमारास पाठविण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता नातेवाईकांकडे सोपविण्यात आला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात