ताजी बातमी

विक्रोळी येथील एका इमारतीच्या बांधकामात भागीदार असल्याचे सांगत तीन ग्राहकांची जवळपास एक कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या विजय सिंग याला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उसाटने येथे सापळा रचत अटक केली. गेले वर्षभर मुंबई पोलिसांपासून पळणाऱ्या विजय सिंग याला विक्रोळी येथील पार्कसाइट पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

विक्रोळी येथील एका इमारतीत घरखरेदी करून देण्याचे आश्वासन देत संबंधित इमारतीच्या बांधकामात आपण भागीदार असल्याचे सांगत विजय सिंग याने २०१६ ते २०१८ या काळात फ्लॅट बुक करण्याच्या नावाखाली तीन ग्राहकांचे चेक घेत ९० लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी गेल्या वर्षी विक्रोळी येथील पार्कसाइट पोलिस ठाण्यात विजय सिंग याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, विजय सिंगने आणखी काही ग्राहकांची घर घरेदी करण्याच्या नावाखाली तब्बल अडीच कोटींची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे मुंबई पोलिस गेल्या वर्षभरापासून विजय सिंग याचा शोध घेत होते, मात्र पोलिसांनी सिंग याला शोधण्यात यश येत नव्हते. विक्रोळी येथील ग्राहकांची फसवणूक करणारा विजय सिंग हा उल्हासनगर येथील उसाटणेजवळील निसर्ग हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी उसाटणे येथील हॉटेलजवळ सापळा रचत विजय सिंगला अटक केली. आरोपीला अटक केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पार्कसाइट पोलिसांशी संपर्क करत आरोपीला त्यांच्या स्वाधीन केले आहे.

 

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात