ताजी बातमी

मुंबईपंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी मुंबईत पोहोचले. यावेळी त्यांनी विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघ टिळक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यानंतर मेट्रोच्या तीन मार्गिका आणि मेट्रो भवनासह मेट्रो कोचचंही उद्घाटन केलं.

मुंबईत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम विले पार्ले येथील लोकमान्य सेवा संघ टिळक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मेट्रोच्या तीन मार्गिकांचे भूमिपूजन केले. गायमुख-शिवाजी चौक (मिरा रोड) मेट्रो १० (. किलोमीटर), वडाळा-सीएसटी मेट्रो ११ (१२. किलोमीटर) आणि कल्याण-तळोजा मेट्रो १२ (२०.) या प्रकल्पांचा समावेश आहे. यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो कोचचेही उद्घाटन करण्यात आले.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात