ताजी बातमी

सप्टेंबरच्या सुरूवातीलाच परतलेल्या पावसाने मुंबईची अक्षरक्षः दाणादाण उडवली. गेल्या चार दिवसात मुंबईत महिन्याभराचा पाऊस पडल्याने जनजीवन कोलमडून पडले. सांताक्रुझ वेधशाळेनं पावसाची नोंद केली असून सप्टेंबर महिन्यात सरासरी 327.1  मिमी पाऊस पडतो. पण 1 सप्टेंबरपासून 4 सप्टेंबर या कालावधीत 488.7 मिमी पाऊस पडला आहे.

गणपती आगमनाच्या पूर्वसंध्येला परतीच्या पावसाने महाराष्ट्रात पाऊल ठेवले होते. 1 सप्टेंबरला सुरू झालेल्या पावसाने मुंबई शहर, उपनगरे, कोकण, पुणे, कोल्हापूर गढचिरोलीसह राज्यात विविध ठिकाणी जोरदार हजेरी लावलीमुंबई शहर उपनगरांमध्ये कोसळणाऱ्या संततधार पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे शहरामधील अनेक भागांमध्ये पाणी साठल्याने रस्ते वाहतुकीला फटका बसला. तसेच अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात