ताजी बातमी

मुंबईतील बहुचर्चित आरे मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीमधील २७०२ झाडं कापण्यासाठी किंवा पुनर्रोपित करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून गुरुवारी परवानगी देण्यात आली. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील वृक्ष प्राधिकरण समितीने ही वृक्षतोड करण्यास परवानगी दिली. मात्र आता या बैठकीसंदर्भात नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. या बैठकीमध्ये सर्व समिती सदस्यांना देण्यात आलेल्या माहितीमध्येआरेचे काँक्रिटीकरण झाले तर पावसाचे सर्व पाणी थेट मिठी नदीमध्ये वाहून जाईल आणि विमातळावर पूर परिस्थिती निर्माण होईल,’ असे नमूद करण्यात आले होते.

आरे येथील जंगल साफ करुन तेथे बांधकाम केल्यास जोरदार पावसात आंतरराष्ट्रीय विमातळावर पूर येईल,’ असा इशा पर्यावरण मूल्यांकन अहवालात देण्यात आला होता. विशेष म्हणजे हा अहवाल या बैठकीला उपस्थित असणाऱ्या समिती सदस्याला बैठकीपूर्वीच देण्यात आला होता असेमुंबई मीररने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.

राज्य सरकारने २०१५ साली नियुक्त केलेल्या तांत्रिक समितीने आरे जंगलासंदर्भातील अहवाल सादर केला होता. या समितीमधील दोन पर्यावरणतज्ज्ञांनी आरेमधील जंगलाच्या जागी बांधकाम केल्यास त्याचा काय परिणाम होईल यासंदर्भात मत व्यक्त करताना आरेमध्ये वृक्षतोड करण्याला विरोध केला होता. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे (एनईईआय) संचालक डॉ. राकेश कुमार आणि प्राध्यापक श्याम असोलेकर यांनी आरेमधील झाडे तोडण्याला विरोध करत त्याचे परिणाम स्पष्ट केले होते. ‘आरेचे काँक्रिटीकरण झाल्यास जोरदार पावसात सर्व पाणी थेट मिठी नदीमध्ये वाहून जाईल. त्यामुळे चकाला आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावर पूर परिस्थिती निर्माण होईल,’ अशी भिती या दोन्ही तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या सभेच्या दोन दिवस आधी आरेसंदर्भातील हा अहवाल १९ सदस्यांना देण्यात आला होता.

मेट्रो साठी बांधण्यात येणाऱ्या कारशेडची नियोजित जागा ही मीठी नदीच्या पाणलोट क्षेत्रात येत असल्याचे या दोन्ही तज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिले. ‘या जमीनीवर कारशेड बांधल्यास पावसाचे पाणी शोषून घेण्याची या जमिनीची क्षमता संपुष्टात येईल,’ असं या दोन्ही तज्ज्ञांनी म्हटले होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात