ताजी बातमी

मुंबईमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बुधावारी दुपारपासून ठप्प झालेली तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेनची वाहतूक हळूहळू सुरु झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक स्थानकांवर ट्रॅकवर पाणी साठल्याने मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. जवळजवळ १२ तासांहून अधिक काळ ही वाहतूक विस्कळीत राहिल्यानंतर ती पूर्णपणे पूर्वपदावर आणण्याचे रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. मध्य रेल्वेच्या मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन अंबरनाथच्या दिशेने पहिली लोकल ट्रेन रात्री तीन वाजून १७ मिनिटांनी सोडण्यात आली. तर दुसरीकडे पश्चिम रेल्वेच्या मार्गावरही रात्रीपासूनच वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरु आहे. काही विशेष गाड्यांबरोबरच चर्चगेटवरुन धिम्या आणि जलद गाड्या बुधवारी रात्री साडेनऊ वाजल्यापासून सोडण्यात आल्या आहेत. हार्बर मार्गावरील सीएसएमटीवरुन पनवलेला जाणारा मार्ग वगळता इतर सर्व वाहतूक सुरु झाली आहे असं मध्य रेल्वेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मध्य रेल्वेच्या मार्गावरील ट्रॅकवर साठलेले पाणी हळूहळू कमी होऊ लागले असून सीएसएमटी वरुन अंबरनाथच्या दिशेने पहिली लोकल ट्रेन रात्री तीन वाचून १७ मिनिटांनी रवाना झाली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात