ताजी बातमी

मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई आणि पालघरला मुसळधार पावसाचा फटका बसला. सतत सुरु असलेल्या पावसामुळे सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला येथील सखल भागांत पाणी साचलं असून रेल्वेसहित रस्त्यावरील वाहतूकही मंदावली. मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले असून अनेकजण रस्त्यांवर तसंच रेल्वे स्थानकांवर अडकून पडले आहेत. राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे. मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

बईमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सप्टेंबरपर्यंत जोरदार ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस पडेल असा अंदाज हवामानखात्याने व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज (गुरुवार दिनांक सप्टेंबर) रोजी मुंबई, ठाणे आणि कोकण विभागातील सर्व शाळ आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ट्विटवरुन बुधावारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही माहिती दिली.

मुंबईमध्ये सोमावार पासूनच थांबून थांबून कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी जोरदार हजेरी लावली. त्यामुळेच शहरामधील अनेक भागांमध्ये पाणी साठल्याने रस्ते वाहतुकीला फटका बसला. तसेच अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साठल्याने पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मुंबईमध्ये पुढील ४८ तासांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित असल्याने सतर्कतेचा उपाय म्हणून शाळांना तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

 

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात