ताजी बातमी

ताडदेव तुळशीवाडी परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणाचा मंगळवारी रात्री शॉक लागून मृत्यू झाला. शोएब हाश्मी असे या तरुणाचे नाव असून, याप्रकरणी ताडदेव पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भानजीभाई राठोड मार्गावरील वन प्लस वन बांधकाम असलेल्या चाळीमध्ये शोएब कुटुंबियांसोबत राहत होता. मंगळवारी तो कामावरून परतला. रात्री साडेआठच्या सुमारास पाणी भरण्यासाठी तो खाली उतरला. सार्वजनिक नळावरून पाणी घेऊन जात असताना शोएबचा पाय घसरला आणि त्याचा स्पर्श उघड्या वायरला झाला. यामुळे त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. परिसरातील नागरिकांनी शोएबला तत्काळ रुग्णालयात नेले पण दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शोएब याचे लग्न ठरले होते. दोन महिन्यानंतर लग्नाचा मुहूर्त होता मात्र त्याआधीच शोएबचा मृत्यू झाल्याने तुळशीवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात