ताजी बातमी

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीत मेट्रो प्रकल्प तीनच्या कारशेडसाठी प्रस्तावित जागेच्या पाहणीनंतरही शिवसेनेने आपला विरोध कायम ठेवला आहे. त्याचबरोबर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेताच पाच हेक्टर जागेवरील झाडे तोडण्यात आल्याने मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेना आणि काँग्रेसने बुधवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत केली. यामुळे कारशेडसाठी झाडे तोडण्याचा प्रस्ताव पुन्हा लांबणीवर पडला आहे.
मेट्रो कारशेडच्या कामासाठी आरे कॉलनीतील २२०० झाडे तोडली जाणार आहेत. मात्र पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची यासाठी मंजुरी आवश्यक असल्याने याबाबतचा प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आला आहे. परंतु, गेली दोन वर्षे यावर निर्णय होऊ शकलेला नाही. ‘आरेमध्ये ज्या ठिकाणी झाडे तोडली जाणार आहेत त्या ठिकाणी वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांनी मंगळवारी भेट दिली.
येथील २७ हेक्टरपैकी पाच हेक्टर जागेवरील झाडे तोडून त्या ठिकाणी कारशेडचे काम सुरू असल्याचे सदस्यांच्या निदर्शनास आले. वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेताच पाच एकर जागेवरील झाडे तोडण्यात येतात कशी, असा सवाल उपस्थित करीत मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात