ताजी बातमी

मुंबईसार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या मुंबईकरांना कारवाईच्या नावाखाली लुटणाऱ्या क्लिनअप मार्शलपासून सावध राहण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. कारवाई करणाऱ्या क्लिनअप मार्शलचे ओळखपत्र तपासावे. तसेच कारवाई करणारा क्लिनअप मार्शल गणवेशधारी असल्याची खात्री करावे, असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने क्लिनअप मार्शलची नियुक्ती केली. या विभागाने अस्वच्छता करणाऱ्यांविरुद्धची कारवाई आणि दंडाची रक्कमही निश्चित केली. त्याचे तक्केही उपलब्ध केले. असे असतानाही पालिकेच्याएनविभाग कार्यालयाच्या हद्दीतील घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या पूर्व-पश्चिम भागात अस्वच्छता करणाऱ्या मुंबईकरांकडून क्लिनअप मार्शल दंडाच्या रुपात अधिक रक्कम उकळत असल्याचे निदर्शनास आले आहे. इतकेच नव्हे तर अस्वच्छता  करणाऱ्यांकडून दंड वसूल करणाऱ्या तोतया क्लिनअप मार्शलविरुद्ध चिराग नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बाब लक्षात घेऊन घाटकोपर रेल्वे स्थानक पूर्व-पश्चिम भागात करण्यात येणारी कारवाई आणि दंडात्मक रकमेची नागरिकांना माहिती देण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत.

फलकावर नमुद केलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम दंडाच्या रुपात क्लिनअप मार्शल, अधिकारी वा संस्थेला देऊ नये. दंडाची रक्कम देण्यापूर्वी क्लिनअप मार्शल वा काामगाराचे ओळखपत्र तपासावे. त्याने गणवेश परिधान केला आहे का याचीही खातरजमा करावी, असे आवाहनएनविभाग कार्यालयाकडून करण्यात आले आहे. ओळखपत्र गणवेश परिधान केलेल्या क्लिनअप मार्शलबाबत स्थानिक पोलीस ठाणे किंवा पालिकेच्या विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात