ताजी बातमी

घरात आर्थिक चणचण आहे, मुलबाळ होत नाही. माझ्याकडे उपाय आहे, असे सांगून धार्मिक विधी करण्याच्या निमित्ताने एका महिलेने पवईतील अनेक गृहिणींना फसविल्याचे उघड झाले आहे. पवईच्या तुंगा गावातून या महिलेने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा सुमारे साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या महिलेची घराघरात प्रचंड दहशत असून याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

साकीविहार मार्गावरील तुंगा येथील सुकुर चाळीत राहणाऱ्या चैताली जाधव यांच्या घरी गेल्या आठवड्यात बुधवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान एक ५५-५८ वर्षांची महिला आली. चैताली यांच्या सासू दरवाज्याजवळ गेल्या असता या महिलेने तुमच्या घरात अनेक समस्या असून तुमच्या मुलांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. या समस्या दूर करण्यासाठी घरात काही धार्मिक विधी करावे लागतील, असे सांगितले. घरात आर्थिक चणचण आणि इतर समस्या असल्याने चैताली आणि त्यांची सासू हे विधी करण्यासाठी तयार झाली. या महिलेने घरात येऊन जमिनीवर तांदूळ पसरविले आणि पिठाचा गोळा काढला. यामध्ये हार बांगड्या अंगठ्या असे सुमारे दोन लाखाचे दागिने आणि काही रोख रक्कम पिठाच्या गोळ्यात टाकल्याचे दाखविले. हा गोळा तळल्यानंतर कापडात बांधून ठेवण्यास आणून सात दिवसांनी उघडण्यास सांगितले. त्यानुसार जाधव कुटुंबियांनी सोमवारी पिठाचा गोळा उघडला त्यावेळी त्यातून दागिने गायब होते

जाधव कुटुंबियांच्या फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यांनी आजूबाजूला या महिलेबाबत चौकशी केली त्यावेळी त्याच्याच चाळीतील नसीम सिद्दीकी या महिलेकडून तिने ८० हजाराची रोकड नेल्याचे समजले. परिसरात या महिलेबाबत चर्चा सुरू होताच गीता पवार या महिलेचे दहा हजार तर आशा हुके या महिलेच्या घरातील सुमारे दीड लाखांचे दागिने घेऊन ही महिला पसार झाल्याचे उघडकीस आले. या सर्वांनी मिळून या महिलेविरोधात तक्रार केली असून पवई वर्णनावरून या महिलेचा शोध घेत आहेत

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात