ताजी बातमी

हॉटेल व्यावसायिक बी. आर. शेट्टी यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी कुख्यात गँगस्टर राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजनसह पाच जणांना विशेष न्यायालयाने मंगळवारी आठ वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच या सहाही आरोपींना प्रत्येकी पाच लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश . टी. वानखेडे यांनी छोटा राजनला ही शिक्षा ठोठावली. छोटा राजनसह नित्यानंद नायक, सेल्विन डॅनियल, रोहित थंगप्पन जोसेफ उर्फ सतीश कालिया, दिलीप उपाध्याय आणि तलविंदर सिंग आदींना मोक्का कायद्यांतर्गत आणि भादंविच्या अनेक कलमांतर्गत दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर या सहाही जणांना ही शिक्षा ठोठावण्यात आली. ऑक्टोबर २०१२ रोजी बी. आर. शेट्टी आपल्या गाडीतून अंधेरी लिंक रोड परिसरातून जात असताना काही अज्ञात लोकांनी मोटरसायकल त्यांच्या गाडीसमोर आडव्या टाकून अंधादूंद गोळीबार केला होता. स्वत: गाडी चालवत असलेल्या शेट्टी यांच्या खांद्यात एक गोळी लागली होती. त्यानंतर त्यांना तातडीने नजीकच्या कोकीलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या हल्ल्यातून बी. आर. शेट्टी थोडक्यात बचावले. याप्रकरणी छोटा राजनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने या सहाही आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते त्याच प्रकरणात मंगळवारी शिक्षा सुनावण्यात आली.

इंडोनेशियातील बालीतून छोटा राजनला २५ नोव्हेंबर २०१५ला अटक करण्यात आली होती. त्यानंतर २७ वर्षे भारतीय तपासयंत्रणेला गुंगारा देणाऱ्या राजनला नोव्हेंबर २०१५ ला भारतात आणले होते. भारतात आणल्यापासून छोटा राजनविरोधातील देशभरातील सर्व खटले हे सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहेत. याआधी पत्रकार जे. डे. हत्याकांड प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात