ताजी बातमी

मुंबई पोलिसांनी ऑस्ट्रेलिया ते पवई व्हाया ब्रिटिश दूतावासामार्फत झालेल्या संवादातून काही तासांत एका ब्रिटिश नागरिकाचे प्राण वाचविले. पोलिसांनी हिरानंदानी येथील फ्लॅटमध्ये वेळेत पोहचून सॅम कोलार्ड (६१) यांना आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त केले. पोलिसांच्या या कामगिरीचे कोलार्ड यांचे कुटुंबीय आणि ब्रिटिश दूतावासानेही कौतुक केले आहे

एका अमेरिकन कंपनीच्या अंधेरी येथील कार्यालयात सॅम कोलार्ड काम करतात. हिरानंदानी येथील ॲवेलॉन टॉवरमध्ये राहणाऱ्या कोलार्ड यांनी २७ जून रोजी ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या पत्नीला फोन केला. मी कंटाळलो आहे आणि स्वतःला संपवीत असल्याचे त्यांनी पत्नीला सांगितले. यामुळे घाबलेल्या पत्नीने मुंबईतील ब्रिटिश दूतावासाशी संपर्क साधला आणि याबाबत माहिती दिली. ब्रिटिश दूतावासाने तत्काळ मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळविले. 'हिरानंदानी'चा परिसर पवई पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने नियंत्रण कक्षातून कळविण्यात आले. सहायक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले यांनी या माहितीची गंभीर दखल घेत पोलिस निरीक्षक अनघा सातवसे, बळवंत देशमुख, सहायक निरीक्षक सचिन वाघ यांच्यासह राम हांडे, नवनाथ जावळे यांनी घटनास्थळ गाठले. ३३व्या मजल्यावर पोलिसांचे पथक पोहोचले. कोलार्ड यांच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. जवळपास दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर कोलार्ड यांचे मन वळविण्यात पोलिसांना यश आले. त्यांनी दरवाजा उघडला पण ते पोलिसांवरच आरडाओरड करू लागले. पोलिसांनी संभाषण कौशल्य आणि प्रसंगावधान राखून त्यांना शांत केले. कोलार्ड यांना अर्धांगवायू झाला होता. त्यामुळे ते व्यथित होते. पण जीवाचे बरेवाईट करण्यापूर्वीच पोलिस त्यांच्यापर्यंत पोहचले आणि एक जीव वाचविण्यात त्यांना यश आले

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात