आज फादर्स डे : बाबाही असतो आई...
मुलांना घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये बाबांनी समरसून सहभाग घ्यायला सुरुवात केली, त्यालाही बराच काळ उलटला. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत बाबा घरी थांबून मुलांची काळजी घेताना दिसत आहेत. आठवड्यातील काही दिवस 'वर्क फ्रॉम होम' करणारे काही बाबा आता पूर्णवेळ घरीच राहून मुलांचे संगोपनकरतानादिसूलागलेआहेत.
नवीन पिढी पालकत्वाच्या नव्या संकल्पनांचा स्वीकार करताना दिसत आहे. आयटी क्षेत्रात १२ वर्षे बिझनेस अॅनालिस्ट म्हणून काम करणाऱ्या सुयोग ढाके यांनी आठवड्यातून दोन दिवस 'वर्क फ्रॉम होम' या पर्यायाचा मुलाच्या वाढीच्या काळात स्वीकार केला. ढाके घरी असताना ते मुलाला पास्ता, नाचोज करून देतात. बटाटा आणि चीजचे स्वयंपाकघरात केलेले प्रयोग बाबानेच करावेत, असा त्यांच्या मुलाचा आग्रह असतो. तर, कांदिवलीचे रहिवासी स्वप्नील जोशी यांनी मुलीच्या जन्मापासून गेली चार वर्षे आठवड्यातून एक-दोनदा घरून काम करण्याचा पर्याय निवडला आहे. मुलीला अंघोळ घालणे, जेवण भरवणे, बागेत खेळायला नेणे अशा सगळ्याच गोष्टी आनंदाने करतात.